Ashvin Rural

  • आमच्या संस्थेचे हॉस्पिटल शासनाने कोविड -१९ या आजारासाठी दि.१६/४/२०२० पासून अधिग्रहित केले आहे.
  • हॉस्पिटल अधिग्रहित केल्यापासून निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्र व आमच्या हॉस्पिटलचा स्टाफ यांनी संयुक्त रित्या कोविडच्या बाबतीत व इतर आजाराच्या बाबतीत प्रचंड काम केलेले आहे.
  • कोविडसाठी स्वतंत्र ओपीडी सुरु करून अनेक रुग्णाची मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.
  • कोविडच्या काळात आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र, निमगावजाळी व आमचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने २४८८ रुग्णावर उपचार करण्यात आले.
  • त्या अगोदर आयसोलेशन सेंटर / विलागीकरण कक्ष म्हणूनही अनेक रुग्णांना लाभ दिला.
  • कोविड अफेक्टेड पेशंटला शासनाने औषध उपचार केला तर आमच्या संस्थेने आयुर्वेदिक काढा, दोन वेळेस चहा, सकाळी अंडी व दुपारी सकस फळे मोफत दैनदिन वाटप करण्यात येत आहे.
  • अलीकडे शासनाने त्यांचे सर्व कर्मचारी काढून घेतल्याने आमच्या हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स व इतर स्टाफ कोरोना पेशंटवर नियमित उपचार करीत आहे.