Ashvin Rural

Nominal Roll of NSS Volunteers 2019- 20

राष्ट्रीय सेवा योजने अन्तर्गत सुरु असलेले उपक्रम

  • रुग्ण तपासणी व चिकित्सा शिबिर

अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, मांची हिल, ता.संगमनेर तर्फ़े राष्ट्रीय सेवा योजने अन्तर्गत नजीक च्या गावांमध्ये रुग्ण तपासणी व चिकित्सा शिबिरांचे आयोजन केले जाते. साधारणत: एवढे रुग्ण या शिबिराचा लाभ घेतात. वाताचे विकार, त्वचेचे विकार, दमा, स्त्रियांचे विकार अशा अनेकविध आजारांवर शिबिरामध्ये यशस्वीपणे तपासणी व चिकित्सा केली जाते.

  • आरोग्य सर्वेक्षण

नजीकच्या गावात जाऊन तेथील लोकांच्या आरोग्यासंबन्धी असलेल्या समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात येते. काही विशिष्ट आजारांची माहिती नोंद करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात येते. त्यासाठी विद्यार्थ्यांचे गट करून हे काम केले जाते.

  • श्रमदान

राष्ट्रीय सेवा योजने अन्तर्गत विद्यार्थ्यांना सामाजिक मूल्ये जपण्याच्या दृष्टीने श्रमदानासारखे उपक्रम राबविले जातात. यामध्ये रस्त्यावरील खड्डे बुजविणे, वृक्षरोपणासाठी खड्डे खोदणे यासारखी कामे केली जातात.

  • आरोग्य जनजागृती अभियान
  • जाहीर व्याख्याने – नामवंत तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जातात. त्याचा लाभ सामान्य व्यक्तींना होतो.
  • पथनाट्य प्रयोग – विद्यार्थ्यांना विविध सामाजिक विषयावर नाटिका तयार करून त्याचे प्रयोग गावात लोकांच्या समोर करणे.
  • रक्तदान शिबिर

महाविद्यालय व रुग्णालयातर्फ़े रक्तदानशिबिराचे आयोजन केले जाते. यासाठी विद्यार्थी, शिक्षक, जवळच्या गावात जाऊन जनजागृती केली जाते. रक्तदानाचे महत्व समजावून सांगितले जाते.

  • वृक्ष लागवड उपक्रम

महाविद्यालयाचा परिसर, गावातील काही ठिकाणे, माळरान, रस्त्याच्या दुतर्फ़ा अशा अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले जाते.

  • अवयव दान जनजागृति

जवळपासच्या गावात जाऊन अवयव दान उपक्रमासंदर्भात लोकांना माहिती दिली जाते.