महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात आयुर्वेद जनजागृती अभियान राबविले जात असून या अंतर्गत दिनांक 25/9/23 रोजी अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, मांची हिल, संगमनेर मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र आश्र्वी खुर्द,संगमनेर येथे गर्भिणी परिचर्या, दिनचर्या-ऋतूचर्या, स्थुलता, मधुमेह व गुदगत विकार- प्रतिबंधात्मक उपाय या विषयांसंबंधित आशा सेविकांकरिता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, विविध पोस्टर लावून व पत्रके वाटुन जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमाचे मार्गदर्शन माननीय प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे सर, डॉ.शामल निर्मळ मॅडम यांनी केले.
डॉ. राजन कुलकर्णी सर (कायचिकित्सा विभाग) यांनी मधुमेह व स्थौल्य व आजची बदललेली जीवन शैली या विषयी मार्गदर्शन केले, डॉ.विद्या सरोदे मॅडम (स्त्री रोग विभाग) यांनी गर्भिणी परिचर्या या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले, डॉ ज्योती चौरे (स्वस्थवृत्त विभाग) यांनी दिनचर्या व ऋतुचर्या विषयी मार्गदर्शन केले ,डॉ दिनेश पानगव्हाणे यांनी गुदगत व्याधी प्रतिबंधात्मक उपाय विषयी मार्गदर्शन केलेनोडल ऑफिसर डॉ. निशांत इंगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले