महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याद्वारे पूर्ण महाराष्ट्रात आयुर्वेद जनजागृती अभियान राबविले जात असून या अंतर्गत दिनांक 30/09/2023 रोजी अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, मांची हिल, संगमनेर शल्य विभाग मार्फत गुदगत विकार- प्रतिबंधात्मक उपाय या विषयांसंबंधित फत तपासणी शिबिर घेण्यात आले, माहितीपत्रके वाटुन जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमाचे मार्गदर्शन माननीय प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे , डॉ.शामल निर्मळ यांनी केले. डॉ शिवपाल खंडिझोड ,डॉ मतीन शेख, डॉ दिनेश पानगव्हाणे (शल्यतंत्र विभाग) यांनी गुदगत व्याधी प्रतिबंधात्मक उपाय विषयी मार्गदर्शन केले व रुग्ण तपासणी केली.
सदर शिबिरामध्ये 32 रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिराकरिता डॉ निशांत इंगळे नोडल ऑफिसर, डॉ शुकाचार्य वाघमोडे निवासी वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल कर्मचारी पूजा तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले.