दि १५/०६/२०२३ गुरुवार रोजी दुपारी २ ते ३ या वेळेमध्ये अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालयाच्या सेमिनार हाँल मध्ये शिक्षकांनी शिक्षकांसाठी प्रबोधनपर सेमिनार उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्य संजीव लोखंडे सर, नवनिर्वाचित प्रभारी प्राचार्या वैद्या श्यामल निर्मळ मँडम, तसेच उपप्राचार्य वैद्य जितेंद्र शिंपी सर, रिसर्च डायरेक्टर वैद्य श्रीरंग छापेकर सर तसेच वैद्या स्नेहा मुजुमदार, वैद्य चंद्रकांत गिरगुने, वैद्य गौरव डोंगरे, वैद्य आतिक मोमीन,वैद्य राहुल बनारसे,वैद्या शर्वरी डोंगरे, वैद्या पुजा देशपांडे , वैद्या मेघना जाधव वैद्या गितांजली आहेर उपस्थित होते. तसेच पदव्युत्तर व चतुर्थ वर्षीय विद्यार्थी देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी स्तवनाने आणि दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या उपक्रमाचे समन्वयक वैद्य तुषार देशपांडे यांनी केले. उपक्रमाच्या वेळापत्रकाप्रमाणे कायाचिकित्सा विभागातील प्रपाठक वैद्य अभिजित गायकवाड यांनी “Diabetes – Its management, In Brief “ या विषयावर विस्तृतपणे व्याख्यान केले. त्यांनी वरील विषयावर लक्षणे आणि औषधे तसेच विविध प्रकार यांवर माहिती सादर केली. सरांनी व्याख्यानाच्या शेवटी प्रश्नोत्तराच्या वेळेत शंकांचे निरसन उत्तम पद्धतीने केले. वैद्य श्रीरंग छापेकर आणि वैद्य श्यामल निर्मळ यांनी विषयावर विस्तृत चर्चां केली. पुढील व्याख्यान दि ३०/०६/२०२३ रोजी स्त्रीरोग आणि प्रसूतितंत्र विभागाकडून होईल असे वैद्य तुषार देशपांडे यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वैद्या श्यामल निर्मळ यांनी केले तसेच उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.