Ashvin Rural

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल येथे शुक्रवार दि.२५/११/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता future Scope in Ayurveda याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी डॉ .प्रभाकर शिवराम पवार यांचे गेस्ट लेक्चर चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजनाने करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य वै.संजीव लोखंडे उपप्राचार्य वै.शिवपाल खंडीझोड रुग्णालय अधीक्षक वै.राजन कुलकर्णी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. डॉ .प्रभाकर शिवराम पवार हे BAMS नंतर BA करणारे महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती आहे. |स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षनम आतुरस्य विकार प्रशमन च | स्वस्थ्य, व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे तसेच रोगी व्यक्तीला त्याच्या विकारापासून मुक्त करणे हेच आयुर्वेदाचे प्रयोजन सांगितले आहे.या प्रयोजना वरूनच आपणास आयुर्वेदाचे दैनंदिन जीवनातील महत्व कळते.पवार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतांना म्हटले की आयुर्वेद हा केवळ रोगाचा विषय नसून तो  संपूर्ण  आयुष्याचा विषय आहे.

         वै.पवार सर यानी आयुर्वेदाबद्दल विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले. यांच्या मार्गदर्शनंतर महाविद्यालयाचे प्राचार्य वै.संजीव लोखंडे यांनी आपले मत व्यक्त केले.

      या कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली . आभार प्रदर्शन चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी पुष्पक चौधरी याने केले. अशाप्रकारे संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संपन्न झाला.