Ashvin Rural

          सालाबादप्रमाणे ह. ब. प. दत्त्गीरीजी  महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फिरता नारळी साप्ताह निमित्त श्री क्षेत्र शेडगाव ता. संगमनेर जि अहमदनगर येथे दि.14/12/2021 रोजी वेळ सकाळी 9 ते 2  या वेळेत आयोजित केला होता. सदर साप्ताहमध्ये  पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणावर भक्त भाविक येतात. सर्व भाविकांनी मोफत रुग्ण सेवा देण्याकरिता अश्विन ग्रामिण आयुर्वेद हॉस्पिटल मार्फत सर्वरोगनिदान शिबीर आयोजित केले होते. सदर शिबिरामध्ये ४५० रुग्णांनी मोफत रुग्ण सेवेचा लाभ घेतला. सदरील शिबीराचा कार्यक्रम पार पडण्यासाठी  हॉस्पिटल  चे अधिकारी, डॉक्टर  व स्टाफ यांचे  मोलाचे सहकार्य लाभले.