Ashvin Rural

दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मांची  हिल येथे माननीय श्री वैद्य लोखंडे सर यांच्या शुभहस्ते मोठय़ा उत्साहात गणपती स्थापना करण्यात आली.  याप्रसंगी कॉलेजच्या प्राचार्या वैद्या श्यामल निर्मल मॅडम, डायरेक्टर   श्री अण्णासाहेब बलमे सर, उपप्राचार्य वैद्य खंडीझोड सर तसेच वैद्य शिंपी सर ,शिक्षकवर्ग, कॉलेज स्टाफ व विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.  गणपती स्थापनेसाठी प्राचार्य निर्मल मॅडम यांच्याकडून डेकोरेशनसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या महाराष्ट्र गावभाग या विषयानुसार डेकोरेशन करण्यात आलेले होते.

 गणपती स्थापनेनंतर  वैद्य श्री निशांत इंगळे सर व वैद्या जयश्री मॅडम यांच्या हस्ते आरती करण्यात आली. आरतीनंतर विद्यार्थ्यांनी गणपती आगमनावर नृत्य सादर केले. या दिवशी आयोजकांद्वारे रांगोळी स्पर्धा व पोस्टर मेकिंग चे आयोजन करण्यात आलेले होते.

दिनांक 20 सप्टेंबर 2023 गणेशोत्सवाचा दुसरा दिवस या दिवशी कॉलेज मध्ये सकाळी 10:00 वाजता वैद्या श्यामल निर्मल मॅडम व वैद्य शिंपी सर यांच्या हस्ते आरती करण्यात आली आरतीनंतर विद्यार्थ्यांनी जुन्या चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य दाखवले याशिवाय प्रश्नमंजूषेचे  आयोजन करण्यात आलेले होते, संगीतखुर्ची, चमचा- लिंबू इत्यादी स्पर्धा ही यात झाल्या  या स्पर्धेमध्ये शिक्षक, कॉलेज स्टाफ इत्यादी ही विद्यार्थ्यासोबत सहभागी झाले होते संध्याकाळची आरती वैद्य मंदार भणगे सर व वैद्य दीपा मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाली.

दिनांक 21 सप्टेंबर तिसऱ्या दिवशी वैद्य गौरव डोंगरे सर व शर्वरी मॅडम यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर संघ नाट्य, कवी संमेलन, परिसंवाद यांचे आयोजन करण्यात आलेले होते.  कविसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कवितासादर करण्यात आल्या. यानंतर संध्याकाळची आरती  श्री वैद्य राजन कुलकर्णी व वैद्य वालझाडे सर यांच्या हस्ते संपन्न झाली. स्थापनेच्या चौथ्या दिवशी सत्यनारायण पूजा  उपप्राचार्य वैद्य खंडीझोड सर व खंडीझोड मॅडम यांच्या हस्ते करण्यात आली. सत्यनारायण पूजेनंतर वैद्य अभिजीत गायकवाड व वैद्य स्मिता मॅडम  यांच्या हस्ते आरती झाली आरतीनंतर  महाप्रसादाचे आयोजन  विद्यार्थी संसदे मार्फत करण्यात आलेले होते. महाप्रसादानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली यामध्ये नाट्य, संगीत महोत्सव व नृत्य यांचे आयोजन करण्यात आलेले होते. संध्याकाळची आरती श्री अनंत बनसोडे व सौ सोनाली बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आली.

           दिनांक 23 सप्टेंबर 2023 पाचव्या दिवस या दिवशी गणेश वंदना व मिरवणूक काढून गणपती विसर्जन करण्यात आले. या दिवशी आरती श्री बलमे सर यांच्याहस्ते करण्यात आली. आरतीनंतर प्रथम वर्षाच्या मुलामुलींद्वारे मानवंदना नृत्य सादर करण्यात आली. या दिवशी संस्थेद्वारे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेली होते. यानंतर मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली व कॉलेज परिसरात असलेल्या तलावात गणपती विसर्जन करण्यात आली. या दरम्यान घेण्यात आलेल्या अनेक स्पर्धांचे बक्षीस वितरण व सत्कार समारंभ ठेवण्यात आला.

           अशा प्रकारे अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल येथे पाच दिवसांसाठी सार्वजनिक गणेशोत्सव 2023 मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम व्यवस्थितरीत्या पार पडण्यासाठी काऊंसिल बॅच, कॉलेज स्टाफ, व शिक्षकवर्ग यांनी परिश्रम घेतले.