Ashvin Rural

शनिवार दिनांक २२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता आयुर्वेद व्यासपीठ नाशिक यांच्या तर्फे आयुर्वेदाचार्य अभ्याक्रमास नुकतास प्रवेश घेतलेल्या सर्व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “अक्षय्यायुर्वेद श्लोक पाठांतर शाळा”! कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नाशिकमधील अन्य आयुर्वेदिक महाविद्यालयांचे प्रथम वर्षांचे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचा आरंभ धन्वंतरी स्तवन या प्रार्थनेने करण्यात आला.कार्यक्रमास नाशिक व संगमनेर येथील महाविद्यालयातून १५० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.या विद्यार्थ्यांना वैद्य.विभव  येवलेकर, वैद्य.निलम गोखले यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून येवला येथील जेष्ठ जाणते वैद्य.रमेश कृष्णाजी तगारे उपस्थित होते. आयुर्वेदीय व्यासपीठ  केंद्रीय अध्यक्ष वैद्य.रजनी गोखले यांनी पाठांतर आणि पुस्तक वाचन याचे महत्व आपल्या मनोगतमधून व्यक्त केले.आयुर्वेद विद्यार्थी वर्गाला ४ प्रकारच्या भाषा संस्कृत, इंग्रजी, माहिती तंत्रज्ञानाची भाषा आणि रुग्ण संवाद भाषा अवगत असाव्यात ह्या बद्दल त्यांनी आग्रही भूमिका मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक शाखेचे अध्यक्ष वैद्य.सौरभ जोशी यांनी केले. सूत्रसंचालन कार्यवाह वैद्य.प्रज्ञा कुलकर्णी यांनी केले.आभार प्रदर्शन सहकार्यवाह वैद्य.प्रदिप गवळी यांनी केले.श्लोकांचे उच्चारण करताना त्या संबंधीचे नियम,  श्लोक/सूत्र पाठांतर कसे करावे? यासंदर्भात मार्गदर्शन केले.

आयुर्वेद व्यासपीठ नाशिक यांचे चतुरसूत्री सेवा,संशोधन,प्रचार,शिक्षण यापैकी या कार्यशाळेमार्फत त्यांनी पहिल्या पुष्पा चे म्हणजेच सेवेचे अर्पण केले,आणि तेथे उपस्थित  सर्व विद्यार्थ्यांनी कार्य शाळेचे पुरेपूर महत्व समजून घेतले. अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयातर्फे या कार्यशाळेचे आम्हा विद्यार्थ्यांना लाभ घेता आला, व निशंकेने या कार्यशाळेचा पुरेपूर उपयोग झाला. आयोजित  कार्यशाळा अत्यंत उत्कृष्टरित्या पार पडली व आम्हा विद्यार्थ्यांना भविष्याच्या वाटचालीस प्रेरणा मिळाली त्याबद्दल अश्विन ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांकडून व्यासपीठाचे मन: पूर्वक आभार.