दि. ०७/०४/२०२३ रोजी BAMS विद्याथ्यांकडून E-Poster Making, E-slogan Making, E-Essay Writing Competition घेण्यात आली. दि. ०८/०४/२०२३ रोजी E-Speech, One Minute Making Video, E-Poem Making ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये BAMS च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दि. १०/०४/२०२३ रोजी अश्विन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मांची हिल येथे अवयव दान जनजागृती अभियान साजरा करण्यात आला तरी या कार्यक्रमासाठी या महाविद्यालयाचे उपप्राचार्य हिंगे राजेंद्र , संदिप तपासे व इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य वै. शिवपाल खंडीझोड यांनी अश्विन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अवयव दानावर मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. शेलवले. डॉ. अत्राम , डॉ. बोरकर उपस्थित होते. दि. १०/०४/२०२३ रोजी आश्विन ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने अवयव दान जनजागृती अभियान साजरा करण्यात आला तरी या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन महाविद्यालयाचे उपप्राचार्य वै. शिंपी सर, वै. खंडिझोड सर, संस्थेचे उपाध्यक्ष मा. बलमे सर व महाविद्यालयाचे शिक्षकवृंद यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्याची देखील उपस्थिती होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. संपदा स्वामी यांनी केले. कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे वैद्य अविनाश जाधव सरांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी मध्ये कु. श्रावणी आणि कू. पवण वाहतुळे यांनी अवयव दान विषयी माहिती दिली.
त्यानंतर वैद्य. शेलवले सर वैद्य डोंगरे सर, तसेच महाविद्यालयाचे उप प्राचार्य वैद्य. शिंपी सर आणि वैद्य. खडिझोड सर यांच्या मार्गदर्शन खाली अवयव दान जन जागृती रॅली काढण्यात आली.तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचा जीएस पुष्पक चौधरी याने केले.व नंतर अवयव दान घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दि. ११/०४/२०२३ रोजी सूर्या नर्सिंग कॉलेज मांची हिल येथील विद्यार्थ्यांना आश्विन ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शिवपाल खंडीझोड यांनी अवयव दानावर मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी नर्सिंग कॉलेजचे १२० विद्यार्थी उपस्थित होते.
दि. ११/०४/२०२३ रोजी अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी मांची हिल येथील प्राचार्य नितीन आहेर यांनी विद्यार्थ्यांना अवयव दाना विषयी माहिती दिली यानंतर आश्विन ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शिवपाल खंडीझोड यांनी अवयव दानावर मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी मांची हिल येथील १०० विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी विशाल बलमे याने आभार मानले.