महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात आयुर्वेद जनजागृती अभियान राबविले जात असून या अंतर्गत दिनांक 26/9/2023 रोजी अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, मांची हिल, संगमनेर मार्फत आठ मोरया गणेश मित्र मंडळ तांबे वस्ती चिंचपूर ,संगमनेर येथे गर्भिणी परिचर्या, दिनचर्या-ऋतूचर्या, स्थुलता, मधुमेह व गुदगत विकार- प्रतिबंधात्मक उपाय या विषयांसंबंधित ग्रामस्थांकरिता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते व मोफत तपासणी शिबिर घेण्यात आले, विविध पोस्टर लावून व माहितीपत्रके वाटुन जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमाचे मार्गदर्शन माननीय प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे सर, डॉ.शामल निर्मळ मॅडम यांनी केले. डॉ शिवपाल खंडिझोड सर (शल्यतंत्र विभाग) यांनी गुदगत व्याधी प्रतिबंधात्मक उपाय विषयी मार्गदर्शन केले व रुग्ण तपासणी केली, डॉ. राजन कुलकर्णी सर (कायचिकित्सा विभाग) यांनी मधुमेह व स्थौल्य संबंधित रुग्णाची तपासणी करून आहार विहार विषयक माहिती दिली.डॉ.विद्या सरोदे मॅडम (स्त्री रोग विभाग), डॉ प्रियंका मेहेर यांनी गर्भिणी परिचर्या या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले, डॉ ज्योती चौरे (स्वस्थवृत्त विभाग) यांनी दिनचर्या व ऋतुचर्या विषयी मार्गदर्शन केले , नोडल ऑफिसर डॉ. निशांत इंगळे यांनी आयुर्वेद जनजागृती अभियानाविषयी माहिती दिली व डॉ वाघमोडे यांनी आभार प्रदर्शन केले. सदर शिबीराकरिता गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री दिपक तांबे व समुदाय आरोग्य अधिकारी अविनाश तांबे यांचे सहकार्य लाभले,ऑफिस स्टाफ श्री राहुल पठारे,श्री प्रशांत वाकचौरे, श्री बर्डे, श्री वाळुंज व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर शिबिरामध्ये 46 रुग्णांनी लाभ घेतला व सर्वांची मोफत BSL तपासणी केली.