महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात आयुर्वेद जनजागृती अभियान राबविले जात असून या अंतर्गत व नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक २०/१०/२०२३ रोजी अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, मांची हिल, संगमनेर यांचे वतीने अंबिका माता मंदिर, धानोरे घाट, पंचक्रोशी ता. राहुरी जि. अहमदनगर येथे सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये गर्भिणी-परिचर्या, दिनचर्या-ऋतूचर्या, स्थुलता, मधुमेह व गुदगत विकार- प्रतिबंधात्मक उपाय या विषयांसंबंधित ग्रामस्थांकरिता व्याख्यान व मोफत सर्वरोग निदान शिबिर प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे, डॉ.श्यामल निर्मळ यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.
धन्वंतरी पूजनाने शिबिराची सुरुवात करण्यात आली. मार्गदर्शनपर व्याख्यानाद्वारे व माहितीपत्रके वाटुन जनजागृती करण्यात आली.
सदर शिबीराचे उद्घाटन अंबिकामाता देवस्थानचे पदाधिकारी व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. श्यामल निर्मळ, डॉ. श्रीरंग छापेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ शिवपाल खंडिझोड, डॉ संजयकुमार धोंडे व डॉ. विशाल ताम्हाणे (शल्यतंत्र विभाग) यांनी गुदगत व्याधी प्रतिबंधात्मक उपाय विषयी मार्गदर्शन केले व रुग्ण तपासणी केली, डॉ.राजन कुलकर्णी, डॉ. अभिजित गायकवाड, डॉ. मंदार भणगे, डॉ. राजेंद्र वाघडकर (कायचिकित्सा-पंचकर्म विभाग) यांनी मधुमेह व स्थौल्य संबंधित रुग्णाची तपासणी करून आहार विहार विषयक माहिती दिली. डॉ. विद्या सरोदे, डॉ विशाखा पाचोरे, डॉ. अनिरुद्ध घुमटकर, डॉ. महेश जाधव (स्त्री रोग विभाग) यांनी गर्भिणी परिचर्या या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले व रुग्ण तपासणी केली, डॉ दिपा भणगे, डॉ. प्रकाश गायकवाड (स्वस्थवृत्त विभाग) यांनी दिनचर्या व ऋतुचर्या विषयी मार्गदर्शन केले, डॉ स्मिता पठारे, व डॉ. पारस पणेर यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली, सदर शिबिराकरिता विविध पदाधिकारी यांच्यासह धानोरे व पंचक्रोशी ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. डॉ.निशांत इंगळे (नोडल ऑफिसर) व डॉ शुकाचार्य वाघमोडे (निवासी वैद्यकीय अधिकारी), डॉ. सागर देवरे, डॉ. दिव्या चौधरी, आंतरवासीय प्रशिक्षणार्थी, हॉस्पिटल कर्मचारी सर्जेराव कडू, रोहित मते, संदेश गाडेकर, राहुल पिंपळे, प्रशांत वाकचौरे, चेतन बोयत, सरला मांढरे, शुभांगी कहार, दिपाली मोरे, प्रशांत फणसे, रोहित तांबे, ऋषिकेश सोनवणे यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतेले. यावेळी शिबिरामध्ये धानोरे पंचक्रोशीतील ८० रुग्णांनी लाभ घेतला. सर्व रुग्णांची मोफत तपासणी, मोफत औषधी देऊन ४० ते ५० रुग्णाचे स्थानिक स्नेहन स्वेदन करण्यात आले.तसेच ६० रुग्णाची मोफत रक्तातील साखर व हिमग्लोबीन तपासणी करण्यात आली.