Ashvin Rural

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय  महाराष्ट्र राज्य, मुंबई  यांच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात आयुर्वेद जनजागृती अभियान राबविले जात असून या अंतर्गत  दिनांक २०/०९/२०२३ रोजी अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय येथे गणेश उत्सवामध्ये गर्भिणी परिचर्या, दिनचर्या- तूचर्या, स्थुलता, मधुमेह व गुदगत विकार- प्रतिबंधात्मक उपाय या विषयांसंबंधित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते माननीय प्रभारी प्राचार्य डॉ.श्या मल निर्मळ व डॉ दिपा भणगे (स्वस्थवृत्त विभाग) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

एकूण 23 विद्यार्थ्यांनी यामधे सहभाग नोंदविला होता.त्यापैकी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे क्रमांक देण्यात आले  यावेळी डॉ.निशांत इंगळे (नोडल ऑफिसर), डॉ ज्योती चौरे, डॉ जयश्री कोल्हे, कॉलेज स्टाफ अशोक पर्वत,गणेश गावडे, संदिप गाडेकर, राहुल पठारे, अनंत बनसोडे, सोनाली बनसोडे, सोमेश गायकवाड उपस्थित होते.