Ashvin Rural

जीवन कलात्मकतेने जगण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जीवन फुलविण्यासाठी काव्यामैफलीचे आयोजन अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयामध्ये करण्यात  आले होते. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कवितेने वेड कवि नारायण पुरी  यांच्या कवितांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेली काटा हि कविता रसिकांच्या आर्त मनाचा ठाव घेणारी ठरली . पारंपारिक जीवनातील व्यथा मांडणाऱ्या कविता श्री.कविवर्य शिवाजी बंडगर यांनी सादर केल्या. ग्रामेण शैलीतून या कविता रसिकांना भावल्या. सोबतच ज्ञानेश डोंगरे यांची हुरडा नावाची लावणी विशेष भावली .