अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय मांची हील आश्वी बु, ता. संगमनेर येथे दि. ०४ फेब्रुवारी २०२३ रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये रॅली चे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य शिवपाल खंडीझोड हे उपस्थित होते.तसेच रसशास्त्र विभागाचे प्रपाठक डॉ.गौरव डोंगरे उपस्थित होते. तसेच इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात ही धन्वंतरी पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चतुर्थ वर्षाची विद्यार्थिनी कु.स्वामी संपदा या विद्यार्थिनीने केली. प्रथम वर्षाचा विद्यार्थी हरी चव्हाण या विद्यार्थ्याने कर्करोगाविषयी अतिशय उत्कृष्ट माहिती दिली. कॅन्सर अर्थात कर्करोग आजही जगासमोरील एक जीवघेणी समस्या आहे. हजारो लोक दरवर्षी कर्करोगामुळे मृत्यू पावतात. पहिल्यांदा जेव्हा कर्करोगाचा जगाशी सामना झाला तेव्हा एक समज निर्माण झाला की जे धुम्रपान करतात त्यांनाच कर्करोग होतो किंवा तंबाखू खाल्ल्यानेच कर्करोग होतो. पण हळूहळू पोटाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि अन्य कर्करोग जगासमोर उलगडू लागले आणि हे सत्य समोर आले की कर्करोग कोणालाही आणि कसाही होऊ शकतो आणि तेव्हापासून कर्करोगाची जास्त भीती निर्माण झाली. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे कधी कधी कर्करोग शरीरात असूनही कळत नाही. पण जस जशी वर्षे लोटली तस तसे विज्ञान प्रगत झाले आणि आता कर्करोगापासून वाचवणारे उपचारही आलेत. पण तरी आजही जनमानसात कर्करोगाबद्दल जागरुकता नाही किंवा त्यांना त्याबद्दल काही माहिती नाही. त्याच दृष्टीने थोडी जागरुकता निर्माण करावी.उत्कृष्ट माहिती दिली.
त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जागतिक कर्करोग दिन निमित्ताने जनजागृती पर रॅली चे आयोजन करण्यात आले. या रॅली मध्ये कर्करोगाचे बॅनर लावून विविध अवयवांचे होणारे कर्करोग महिलांमध्ये होणारा स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) मुखाचा कर्करोग (Oral Cancer ) रक्ताचा कर्करोग (Blood Cancer ) फुफ्फुसाचा कर्करोग (Lungs Cancer ) मुखाचा कर्करोग (Mouth cancer ) अशा अनेक कर्करोगांचा फलक घेऊन प्रचार प्रसार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कर्करोगावर अनेक घोषणा देण्यात आल्या.अश्या प्रकारे महाविद्यालयामध्ये जागतिक कर्करोग दिन अतिशय उत्कृष्ट पणे पार पडला.या संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात प्रथम वर्ष इंचार्ज सौ. सोनाली बनसोडे व चतुर्थ वर्ष इंचार्ज राहुल पठारे यांचे सहकार्य लाभले.