अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, मांची हिल, आश्वी बु. ता. संगमनेर या महाविद्यालयात निरंतर धन्वंतरी आरोग्य विज्ञान व्याख्यानमाले अंतर्गत सोमवार दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी जागतिक ख्यातीचे आयुर्वेद तज्ञ व लेखक डॉ. वसंत लाड (अमेरिका) यांचे आयुर्वेद काल, आज आणि उद्या आणि लोकल टू ग्लोबल या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते यावेळी ‘मांची हिल हे आयुर्वेदाचे प्रेरणास्थान आहे’ असे गौरव त्यांनी उदगार काढले. परदेशात आयुर्वेदाला असलेले महत्व आणि आयुर्वेद क्षेत्रातील संधी, आयुर्वेद काल, आज आणि उद्या, लोकल टू ग्लोबल या विषयावर मार्मिक शब्दात त्यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.प्रसंगी त्यांनी संस्थेच्या शाळा, फार्मसी कॉलेज, पब्लिक स्कूल, गोशाळा विविध युनिटला सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. ज्ञानगंगा विद्यानिकेतन शाळेला भेट दिली असता विद्यार्थ्यांचे भगवतगीता अध्याय पठण ऐकून माझे हृदय भरून आले व मला माझ्या लहानपणीची आठवण झाली असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. लाड यांनी अश्विन ग्रामीण आयुर्वेद हॉस्पिटलला विविध विभागामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णाची पाहणी करून उपचाराबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजनाने झाली. प्रमुख पाहुण्याचे हस्ते धन्वंतरी पूजन संपन्न झाले. उपस्थित पाहुण्यांचा मराठमोळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर डॉ. वसंत लाड, डॉ. दिनकर, डॉ. हंसा, डॉ. खंडेलवाल, डॉ. शशिकांत काळे, सौ. मृणाल काळे, संस्थचे संस्थापक होडगर साहेब, संस्थेचे विश्वस्त डॉ. शैलेन्द्रसिंह होडगर, उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे, डॉ. श्यामल निर्मळ, उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. जितेंद्र शिंपी, डॉ. चंद्रकांत गिरगुणे, डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. गौरव डोंगरे, डॉ. अविनाश जाधव, डॉ. अतिक मोमीन, डॉ. विक्रम शेलवले, डॉ. शर्वरी डोंगरे, डॉ. ज्योती खंदारे, डॉ. अंकिता काळे, डॉ. रवींद्र अत्राम, डॉ. निशांत इंगळे, डॉ. जयश्री कोल्हे, डॉ. गीतांजली आहेर. श्री. रावसाहेब काळे आदी उपस्थित होते. प्रसंगी संस्थेचे संस्थापक होडगर साहेब यांनीही आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजीव लोखंडे यांनी केले व डॉ. जितेंद्र शिंपी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आभारप्रदर्शन डॉ. शैलेन्द्रसिंह होडगर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. गायत्री नखाते हिने केले. यावेळी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी- विद्यार्थिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.