Ashvin Rural

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल, येथे वाचन प्रेरणा दिन स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात आला. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन या नावाने ओळखले जाते. आला.यावेळी प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड उपस्थित होते. शारीर रचना विभागाचे अधिव्याख्याता वै.चंद्रकांत शिंदे  उपस्थित होते. तसेच रसशास्त्र विभागाचे प्रपाठक  वै.गौरव डोंगरे उपस्थित होते. इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी धन्वंतरी पूजन करण्यात आले. तसेच माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रथम वर्षातील विद्यार्थिनी ईश्वरी जगदाळे ह्या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले.

ग्रंथ आमुचे साथी ग्रंथ आमुच्या हाती ….ग्रंथ उजळतो अज्ञानाच्या ….अंधाराच्या राती |या ग्रंथाच्या तेजामाधुनी,जन्मा येते क्रांती, ग्रंथ शिकवितो माणुसकी  अन ग्रंथ शिकविती शांती निराश जीवा धीर धरूनी पढे घेउनी जाती. ग्रंथ आमुचे साथी ग्रंथ आमुच्या हाती. ग्रंथ उजळतो अज्ञानाच्या ….अंधाराच्या राती  यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.