दि. १४/०४/२०२३ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अश्विन ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन महाविद्यालयाचे उपप्राचार्य वैद्य. खंडिझोड शिवपाल तसेच शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते. प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर धन्वंतरी स्तवन घेण्यात आले.व श्री. अशोक गायकवाड यांनी बुद्ध धर्मीय प्रार्थना अतिशय सुंदर पद्धतीने सादर केली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. आदिती कासव व कू दीक्षा महाजन यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे पर्वत सर, गायकवाड सर तसेच वैद्य.खंडीझोड सरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाबद्दलचे प्रेम समर्पण सांगत आज आपल्याला मिळत असलेले अधिकार या बद्दल अमूल्य असे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये कू. हरी चव्हाण कू.अपूर्वा दांडगे, कु.बनकर साक्षी, कु. हिंगे संजना यांनी या महामानवाला अभिवादन करत त्याच्या जीवनात घडलेले प्रसंग योग्य ते मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या जयंतीला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून ओळखले जाते. आंबेडकर हे आपल्या देशातील आघाडीचे आणि महान समाजकार्य केलेले महापुरुष म्हणून ओळखले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी भारतातील महू येथील एका दलित कुटुंबात झाला. त्यांना भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर म्हणून ओळखले जाते. ते भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्री ते जागतिक दर्जाचे वकील, समाजसुधारक आणि प्रथम क्रमांकाचे जागतिक दर्जाचे विद्वान होते. भारतातील दलित बौद्ध चळवळीचे प्रेरक शक्ती म्हणून त्यांना श्रेय देण्यात येते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे श्री.नागरे सर यांनी केले. वैद्य. खंडिझोड शिवपाल यांच्या मार्गदर्शन खाली कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.