NCISM द्वारे निर्देशित द्वितीय वर्ष BAMS च्या रसशास्त्र व भैषज्यकल्पना या विषयाच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांनी आयुर्वेद फार्मसीला भेट देउन त्याची माहिती घेणे आवश्यक असते. त्याप्रमाणे रसशास्त्र व भैषज्यकल्पना विभाग, अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल च्या वतीने द्वितीय वर्ष BAMS च्या विद्यार्थ्यांसाठी “औषधी भवन आयुर्वेद फार्मसी, नाशिक” येथे भेटीचे आयोजन दि.१७/११/२०२२ रोजी करण्यात आले होते. सकाळी ११ ते दु.१ या दरम्यान सदर भेट संपन्न झाली. या भेटीसाठी रसशास्त्र व भैषज्यकल्पना विभागातील प्रपाठक वैद्य गौरव डोंगरे, सहाय्यक प्राध्यापक वैद्य आतीक मोमिन तसेच अध्यापकेतर कर्मचारी श्री संजय आंधळे हे उपस्थित होते. औषधीभवन आयुर्वेद फार्मसी चे वैद्य प्रसाद पण्डित व अन्य सहकारी वैद्य यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी मधील औषधीनिर्माण तसेच फार्मसी मधील विभाग याविषयी उत्तमप्रकारे मार्गदर्शन केले.
फार्मसी भेटीमध्ये
कच्चा माल विभाग (Raw material section)
चूर्ण विभाग (Powder section)
गुटीवटी विभाग (Tableting section)
स्नेहसिद्धी विभाग
आसवारिष्ट विभाग
भस्म विभाग
अवलेह विभाग
पक्का माल विभाग (Finish product section)
औषध गुणवत्ता तपासणी कक्ष (Quality control laboratory)
या सर्व विभागांची योग्य प्रकारे माहिती देण्यात आली. तसेच फार्मसी मध्ये असलेल्या आत्याधुनिक यन्त्र व उपकरणांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांना आयुर्वेदीय औषधीनिर्माणासाठी प्रोत्साहन देण्यात आले.