Ashvin Rural

कोजागिरी पोर्णिमा मुहूर्तावर  

              रविवार दिनांक ०९/१०/२०२२ रोजी अश्विन ग्रामीण आयुर्वेद हॉस्पिटल मार्फत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भव्य दमा (अस्थमा) शिबिराचे आयोजन हॉस्पिटल प्रांगणात करण्यात आले. या शिबिरात एकूण १२१रुग्णांनी लाभ घेतला, रात्री ठीक बारा वाजता खिरीमध्ये पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पडल्या नंतर त्यामध्ये दमा आजारावरील औषध मिसळून ते रुग्णांना देण्यात आले. हे औषध पिल्याने दमा (अस्थमा ) पूर्णपणे बरा होतो, असा पुरातन काळापासून इतिहास आहे. या शिबिरासाठी अध्यक्ष म्हणून मा. डॉ.श्री. शैलेंद्रसिंग होडगर साहेब यांची उपस्थिती लाभली तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संजीव लोखंडे लाभले तसेच पाहुणे मंडळी श्री. हरिभाऊ ताजने माजी सरपंच अश्वि बु.||,सकाहरी बाबुराव नागरे माजी सरपंच शेडगाव हे देखील उपलब्ध राहिले व शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स लाभले त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. शिवपाल खंडिझोड, डॉ. निशांत इंगळे, डॉ. विनायक चकोर, डॉ. शुकाचार्य वाघमोडे आदी डॉक्टर्स उपस्थित होते.

           कार्यक्रमाला प्रत्यक्षात रात्री ठीक ९:०० वाजता सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बाळाराम सांगळे यांनी केले. ते कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. शिवपाल खंडिझोड यांनी करून रुग्णांना कोजागिरी पौर्णिमेचे महत्व रुग्णांना समजावून सांगितले. तसेच डॉ. राजन कुलकर्णी यांनी हॉस्पिटल व विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. डॉ. संजीव लोखंडे यांनी कोजागिरी पौर्णिमा व या पौर्णिमेच्या दिवशी दिल्या जाणाऱ्या औषधाविषयी माहिती व महत्व रुग्णांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. श्री. शैलेंद्रसिंग होडगर यांनी सर्व रुग्णांना आरोग्य व आयुर्वेद यावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच  प्रा. दत्ता शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.