अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल येथे दि. १३/८/२०२१ ते २०/८/२०२१ या कालावधीत महाअवयव दान साप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अवयव दानाचे महत्व पटवून देण्यात आले. प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अवयव दान श्रेष्ठदान या संदर्भात कार्यक्रम घेण्यात आले.अवयवदानामुळे दृष्टी मिळू शकते. एखाद्याचा अवयव दानामुळे जीव वाचू शकतो. चांगले जीवन एखाद्याला जगता येते.
दि. १३/८/२०२१ रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धकांना बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात आले. दि. १४/८/२०२१ रोजी रांगोळी स्पर्धा आणि पोस्टर्स (चित्रकला) स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. दि.१२/८/२०२१ रोजी ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक यांनी सहभाग नोंदविला. अशा प्रकारे अत्यंत उत्साहात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आणि महाअवयव दानाचे महत्व शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना पटवून देण्यात आले.