साईदीप हॉस्पिटल अहमदनगर, आनंद नेत्रालय नगर, अश्विन ग्रामिण आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल, जिल्हा परिषद अहमदनगर आरोग्य विभाग व डॉ. गंधे हॉस्पिटल जखणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीर रविवार दि:- १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ०२ या वेळे मध्ये झाले.ठिकाण:- साई मंगल कार्यालय, टाकळी खादगाव ता. जि अहमदनगर या रोगनिदान शिबिराप्रसंगी डॉ. किरण दीपक, डॉ. श्रीधर बधे, डॉ. गणेश मैंड, डॉ. भूषण खर्चे, डॉ. वैशाली किरण, डॉ. प्रणाली राठोड, डॉ. पायल रोहित धूत, डॉ. गणेश सारडा, डॉ. सुयश गंधे, डॉ. दत्तात्रय अधुरे, डॉ. संजीवकुमार लोखंडे, डॉ. मंदार भणगे, डॉ. रवींद्र मिरगणे, डॉ. संजयकुमार धोंडे, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. अविनाश जाधव. याची उपस्थिती होती. सदर शिबिरामध्ये २४० रुग्णानी मोफत रुग्ण सेवा व उपचाराचा लाभ घेतला.