गणेशोत्सव २०२२ निमित्ताने अश्विन ग्रामिण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०२/०९/२०२२ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदरील शिबिरामध्ये ५० रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. सदरील रक्तदान शिबिरास आधार रक्तपेढीचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच रक्तदान शिबिरामध्ये अश्विन ग्रामिण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी, सूर्या नर्सिंग कॉलेज, ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांची हिल इत्यादी विभागातील विद्यार्थी व कर्मचार्यांनी रक्तदान केले.