Ashvin Rural

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल, येथे राष्ट्रीय एकता दिवस दि.३१ऑक्टोबर रोजी “ रन फॉर युनिटी चे आयोजन करण्यात आले होते. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड उपस्थित होते. तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी धन्वंतरी पूजन करण्यात आले. तसेच भारताचे पहिले गृहमंत्री व उपमुख्यमंत्री, लोहपुरूष या उपाधिने गौरविलेले सरदार वल्लभभाई पटेल  यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वतंत्र सैनिक सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतात ३१ ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. हे देशाचे पहिले गृह मंत्री देखील होते. भारताच्या एकात्मतेसाठी पटेल यांच्या महत्वपूर्ण प्रयत्नांबद्दल देश कृतज्ञ म्हणून हा दिवस त्या राष्ट्रीय एकात्मतेला श्रद्धांजली म्हणून साजरा केला जातो. सरकारने २०१४ मध्ये घोषित केले की ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात यावी.भारताच्या गुजरात राज्यातील नर्मदा नदी वर असलेल्या साधू बेटावर हे स्मारक आहे. हे स्मारक २०,००० स्क्वेअर मीटर मध्ये व्यापले असून सभोवताली १२ चौरस किलोमीटर कृत्रिम तलाव बांधलेले आहे १८२ मीटर (५९७ फुट) उंची असलेला हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. यानंतर प्रथम वर्षातील विद्यार्थिनी कु.ईश्वरी जगदाळे ह्या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले.तसेच “राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेण्यात आली. अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.