Ashvin Rural

आपल्या भारत देशात दरवर्षी ५सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हे थोर विचारवंत, विद्वान तसेच महान शिक्षक होते त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपले विशेष योगदान दिले आहे. अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय मध्ये दि.५ सप्टेंबर २०२२ रोजी शिक्षक दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला.यावेळी  महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्य.संजीव लोखंडे उपप्राचार्य वैद्य.शिवपाल खंडीझोड, संस्थेचे उपाध्यक्ष श्री.अण्णासाहेब बलमे,हॉस्पिटल मधील deputy superintendent वैद्य.राजन कुलकर्णी  तसेच संस्थेतील इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजनाने झाली.धन्वंतरी स्तवन करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना आदित्य नालकोल या विद्यार्थ्याने केली.विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकाबद्दलचे मनोगत व्यक्त केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्य. लोखंडे सर यांनी विद्यार्थ्यांना ५सप्टेंबर हा दिवस शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे.शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांवर तसेच समाजावर चांगले संस्कार करतात .आपल्या देशात गुरुचे महत्व ईश्वरासमान आहे.आपण सर्वांनी त्यांचा नेहमी आदर करावा. अशा  मार्मिक शब्दात विद्यार्थ्यांना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशाप्रकारे शिक्षक दिन चा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.