Ashvin Rural

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर 

        महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या विद्यमाने एकलव्य आ. भ. वि. जा. ज. व मा. से संस्थेचे महाविद्यालय व हॉस्पिटल मांची हिल, आश्वी बु|| ता संगमनेर आयोजित राष्ट्रीय सेवा अंतर्गत विशेष आरोग्य शिबीर दि. ०२/०५/२०२२ ते ०८/०५/२०२२ या कालावधीत मौजे शिबलापूर ता. संगमनेर जि अहमदनगर या ठिकाणी पार पडले. या शिबिरांतर्गत शिबलापूर परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये 
1)  आरोग्य तपासणी शिबीर 
२)कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण 
 3 ) गावातील कोविड १९  आरोग्य तपासणी व मार्गदर्शन 
4 )आरोग्य विषयक व्याख्याने 
5)ग्राम स्वच्छता अभियान 
ई गोष्टींचा अंतर्भाव होता 
      आरोग्य तपासणी शिबारीसाठी वैद्य डॉ. अविनाश जाधव, डॉ. गौरव डोंगरे, डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. विनायक चकोर, डॉ. मतीन शेख, डॉ. मंदार भणगे , डॉ. मनोज कुलकर्णी, डॉ. स्मिता कोलते, डॉ. रवींद्र आत्राम, डॉ. जना आव्हाड, डॉ. श्रीरंग छापेकर, डॉ. विक्रम शेलवले, डॉ. निशांत इंगळे, डॉ. कुलदीप रजपूत, डॉ. तुषार देशपांडे, यांनी काम  पाहिले. सदर शिबिरामध्ये ४० रुग्णांनी मोफत लाभ घेतला. सदर शिबीर पार पाडण्यास अश्विन ग्रामिण आयुर्वेद  हॉस्पिटल स्टाफ व शिबलापूर ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.