Ashvin Rural

आज दि. 10/03/2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आश्विन ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली तरी या उत्सवा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन संदिप दादा पवार (शिवव्याख्याते) यांची उपस्थिती प्रार्थनीय होती तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य वैद्य शिंपी सर संस्थेचे उपाध्यक्ष मा. बलमे सर व महाविद्यालयाचे शिक्षकवृंद यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्याची देखील उपस्थिती होती. त्यानंतर शिवव्याख्याने संदीपदादा पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व अभिषेक करून व्याख्यानाला सुरुवात झाली. कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. संस्कृती ढगे व कु. निकिता निगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचा GS पुष्पक चौधरी याने केले. कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे CS वैद्य रविंद्र अत्राम सरांची विशेष उपस्थिती होती त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे विद्यार्थी कु. स्नेहा भालके कु. साहिल बिडवे, कु. वैभव ठाकरे यांनी छत्रपती शिवरायां विषयी असलेली आस्था व्यक्त -केली. शिवजयंतीचे औचित्य साधून दि. 20/02/2023 रोजी आश्विन ग्रामीण आयुर्वेदिक रुग्णालयामार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते या प्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षकवर्ग वैद्य. निशांत इंगळे सर व वैद्य. गौरव डोंगरे सर यांच्यासह इतर कर्मचारी वर्ग व ४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबीरान सहभाग नोंदवला.