Ashvin Rural

अश्विन ग्रामिण आयुर्वेद रुग्णालय मांची हिल,आश्वी बु||  ता .संगमनेर जि .अहमदनगर बालरोग (कौमारभृत्य ) विभाग आयोजित सुवर्ण प्राशन संस्कार /शिबीर दि .२१/०९/२०२२ वार. बुधवार वेळ -१० ते ०२ या वेळेत पार पडले. सुवर्ण प्राशन हे लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असते .हा संस्कार वय वर्ष ० ते १२ वयोगटातील मुलांना प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रात देण्यात येतो.या औषधामध्ये सोने, मध, तूप आणि औषधी वनस्पती यांचे मिश्रण असते . सदर शिबिरात डॉ.निलम हंडे ,डॉ.विक्रम शेलवले,डॉ जयप्रकाश खैरनार,डॉ.सचिसाळुंखे,डॉ.महेश जाधव व तसेच बालरोग विभाग प्रमुख श्री.संदेश गाडेकर व पी .जी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले .सदर शिबिरामध्ये ० ते १२ वयोगटातील ८३ मुला-मुलींनी या शिबिराचा लाभ घेतला.