गुरुवार दि. १४ एप्रिल २०२२ वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० पर्यंत
ठिकाण : दीपक गायकवाड यांच्या ट्रक्टर दुरुस्ती दुकानाच्या मोकळ्या परिसरात ता. संगमनेर, जि. अहमदनगर
आश्वी बु ||, या गावामध्ये १४ एप्रिल २०२२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले. अश्विन ग्रामीण आयुर्वेद हॉस्पिटल. मांची हिल तालुका संगमनेर भव्य सर्वरोग निदान शिबीर ठिकाण:आश्वि बुद्रुक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर दिनांक 14/4/2022 रोजी वेळ:सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत आज आश्वि बुद्रुक येथे मांची हिल येथील अश्विन ग्रामीण आयुर्वेद हॉस्पिटल तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये 84 पेशंट ने शिबिराचा लाभ घेतला यामध्ये सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उदघाटन संपन्न झाले. प्रमुख उपस्थिती 1) अशोकराव म्हसे पाटील(चेअरमन प्रवरा बँक लि) 2)हरिभाऊ ताजने पाटील (माजी सरपंच), 3)नवनाथ ताजनेपाटील (सामाजिक कार्यकर्ते) 4)अजय ब्राह्मणे पाटील हे उपस्थित होते प्रस्तावना/सूत्र संचालन इंजि:बाळाराम सांगळे शिबिर माहिती डॉक्टर शिवपाल खंडीझोड आभार प्रा.दत्ता शिंदे शिबिराकरिता उपस्थित डॉक्टर स्टाफ – 1) डॉ.शिवपाल खंडिझोड 2) डॉ.निशांत इंगळे 3) डॉ.अविनाश जाधव 4) डॉ.विनायक चकोर 5) डॉ. शशिकांत काळे 6) डॉ.तेजस्विनी मोरे 7) डॉ.शुक्राचार्य वाघमोडे अशाप्रकारे शिबिरास चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे. कॅम्प यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटल मधील डॉक्टर्स ,इंटर्न,कर्मचारी,तसेच मांची हिल चे इतर सहकारी यांनी विशेष कष्ट घेतले .