Ashvin Rural

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय  मांची हिल, आश्वी बु. ता. संगमनेर या महाविद्यालयात  वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये  विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक  यांचे मार्गदर्शनाखाली दि. १४   जून  २०२३ रोजी जागतिक रक्तदाता दिनाचे  औचित्य साधून आधार  रक्तपेढी, संगमनेर  यांचे संयुक्त विद्यमाने  भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. धन्वंतरी  पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.

संस्थेचे उपाध्यक्ष आण्णासाहेब बलमे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे, डॉ. श्यामल निर्मळ, उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड, एन.एस.एस. चे समन्वयक डॉ. गौरव डोंगरे , आधार  रक्तपेढी, संगमनेर  यांचा स्टाफ  यांचे शुभहस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. निशांत इंगळे. डॉ. अतिक मोमीन, डॉ. रवींद्र अत्राम, डॉ. विक्रम शेलवले, डॉ. दिनेश पानगव्हाणे, डॉ. शुकाचार्य वाघमोडे, डॉ. मेघना जाधव, डॉ. विद्या सरोदे, डॉ. ज्योती चौरे, हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी दत्ता शिंदे, सर्जेराव कडू, अशोक पर्वत, रंगनाथ गिते, संदीप गाडेकर, बाळासाहेब नागरे, राहुल पठारे, गोरक्ष शिंदे , संजय आंधळे, अशोक गायकवाड, प्रशांत वाकचौरे, संदेश गाडेकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्थेतील  अश्विन ग्रामीण आयुर्वेद कॉलेज व  हॉस्पिटल, अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी, ज्ञानगंगा विद्यानिकेतन प्राथ. माध्यमिक व ज्यूनिअर  कॉलेज, आय.टी.आय.कॉलेज, सूर्या नर्सिंग कॉलेज, यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल,अश्विन वरिष्ठ महाविद्यालयातील स्टाफ व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले. रक्तदात्यांना आधार  रक्तपेढी, संगमनेर  यांचेकडून प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटल कर्मचारी, आधार  रक्तपेढी, संगमनेर  कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी आदिंनी विशेष परिश्रम घेतले.