Ashvin Rural

२१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालयामध्ये  विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये “एकपृथ्वी,एक आरोग्यासाठी योग” ही थीम होती. या घोषणेनुसार, “योग म्हणजे स्वतःचा प्रवास, स्वतःमधून स्वतःकडे…” या प्रसंगी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. योग जागरूकता या  कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

दिनांक

उपक्रम

१३/६/२०२५

निबंध स्पर्धा – थायरॉइड साठी योग

१४/६/२०२५

पोस्टर स्पर्धा – उच्च रक्तदाबासाठी

१६/६/२०२५

रील स्पर्धा – पाठीच्या दुखण्यासाठी

१७/६/२०२५

रांगोळी स्पर्धा – स्थुलतेसाठी योग

१८/६/२०२५

प्रश्नमंजुषा व रुक्षरोपण उपक्रम

१९/६/२०२५

योग क्रिया सत्र- प्रवक्ते श्री लेंडे सर

20/६/२०२५

सादरीकरण – मानसिक आरोग्यासाठी योग

२१/६/२०२५

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा- नृत्य व योग सादारीकरण

या योग दिनी विद्यार्थ्यांच्या  कौशल्यांना चालना देण्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आले होते आणि डॉ. सिद्धेश सरांनी मृत्युंजय बॅचमधील सुरेखा पालवे हिची विजेता म्हणून निवड करण्यात आली. पोस्टर बनवण्याच्या स्पर्धेसाठी टॉप सहा  पोस्टर निवडण्यात आले होते; आणि थीम प्रेझेंटेशन आयोजित करण्यात आले होते; त्यातील प्रत्येकाने उत्कृष्टपणे सादर केले होते. वैद्या गीता दातीर मॅडम यांनी  ब्रम्हास्त्र बॅचमधील संपदा पाटोळे हिची  निवड केली योग दिनाचे सौंदर्य दर्शविणाऱ्या रील स्पर्धेत विविध सौजन्यशील आणि उत्साही “रील्स” सादर करण्यात आल्या  होत्या; तसेच डॉ. निशांत इंगळे आणि डॉ. जयश्री इंगळे मॅम यांनी यशराज भाकरे  आणि रुद्र बॅचमधील गटाची विजेता  म्हणून निवड करण्यात आली. याचप्रमाणे रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि अनेक विद्यार्थ्यांनी कौशल्ये दाखवली. त्यात डॉ. तुषार देशपांडे सर आणि डॉ.पूजा मॅम यांनी ब्रह्मास्त्र बॅचमधील श्रुतिका व  गटाला विजेता म्हणून निवडले.

विद्यार्थ्यांना विविध गट आणि कार्यांमध्ये विभागले गेले. वृक्षारोपण संबंधित वृक्ष वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी योगा  रायझिंगझुम्बा नृत्य दाखवले – आमच्या सभोवताली जागरूकता वाढविण्यासाठी नृत्य स्पर्धांमध्ये कौशल्ये आपल्या सभोवतालच्या योगाचे सौंदर्य हे या डान्स चे प्रदर्शनाचा हेतू होता, आणि डॉ. निर्मल मॅम यांनी ब्रह्मास्त्र बॅचमधील कल्याणी व  गटाला विजेता म्हणून निवडले. पीपीटी सादरीकरण या  स्पर्धेतहि अनेक विद्यार्थी सहभागी झाले असून  आपले योगाबद्दल चे चित्रीकरण दर्शविन्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यांची प्रतिमा दर्शवताना  मुलांमध्ये एक उत्साह होता, डॉ. गौरव डोंगरे सर आणि डॉ. शर्वरी डोंगरे मॅम यांनी मृत्युंजय बॅचमधील श्रद्धा धिमधिमे हिला  विजेता म्हणून निवडले.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १७० होती जी खूप चांगली दिसून आली. त्यांच्यात उत्साह आणि स्पर्धात्मक भावना होत्या असे निदर्शनास आले असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे आभार आणि स्वागत वरिष्ठांनी केले.