Ashvin Rural

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांचीहिलआश्वी बु।।, ता.संगमनेर जि.अहिल्यानगर बालरोग (कौमारभृत्य) विभाग आयोजित सुवर्ण प्राशन संस्कार / शिबीर दि.२७/०६/२०२५ रोजी वेळ १० ते ०५ या वेळेत पार पडले. सुवर्णप्राशन हे लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असते. हा संस्कार वय वर्ष ० ते १२ वयोगटातील मुलांना प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रात देण्यात येतोया औषधामध्ये सोनेमधतूप आणि औषधी वनस्पती यांचे मिश्रण असते. सदर शिबिरात डॉ.जयप्रकाश खैरनारडॉ.निलम हांडेडॉ. अमेय गुणेडॉ.विक्रम शेलवले, डॉ.अमृता धनेश्वर, डॉ.संतोष काळबांडे व तसेच इंटर्न व पी जी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  सदर शिबीर अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांचीहिल. मध्ये पार पडले. सदर शिबिरामध्ये ० ते १२ वयोगटातील १६० मुला-मुलींनी या शिबिराचा लाभ घेतला.