Ashvin Rural

अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, यांच्या वतीने सदर शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावजाळी ता. संगमनेर जि अहिल्यानगर येथे पार पडले . शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी तपासणी करण्यात आली तसेच औषधी वाटप करण्यात आले. शिबिरामध्ये १८ रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. सदर शिबिरासाठी डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, श्री.प्रवीण कडू, पदव्युत्तर विद्यार्थी (PG), आंतरवासियता विद्यार्थी (Interns) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.