अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांची हिल यांच्या वतीने दि ०९/११/२०२५ रोजी जेष्ठ नागरिक यांची आरोग्य तपासणी शिबीर पार पडले.सदर शिबिरामध्ये जेष्ठ नागरिक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच त्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आले. सदर शिबिराकरिता डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. अविनाश जाधव, डॉ.शिवपाल खंडीझोड आदि तज्ञ डॉक्टर उपस्थित होते सदर शिबिरामध्ये एकूण १३६ नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली.