Ashvin Rural

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय  मांची हिल, आश्वी बु. ता. संगमनेर या महाविद्यालयात भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये  विभाग, आयुष संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक  यांचे मार्गदर्शनाखाली दि. २१  जून  २०२३ – जागतिक योगा  दिनाचे  औचित्य साधून दि. १४ जून ते २१ जून या कालावधीत ‘योग साप्ताह’ चे  आयोजन करण्यात आले होते. यामध्ये     विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

‘जागतिक योग सप्ताह’ निमित्त दि. १४ जून रोजी निबंध स्पर्धा, दि. १५ जून रोजी वत्कृत्व स्पर्धा, दि. १६ जून रोजी पोस्टर स्पर्धा, दि. १७ रोजी ध्यानधारणा मेडिटेशन, दि. १८ रोजी सूर्यनमस्कार, योगासने स्पर्धा, दि. १९ रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

तसेच २१ जून रोजी सकाळी ९.०० वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात योगतज्ञ रखमाजी लेंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिक योग प्रात्यक्षिक आयोजन करण्यात आले होते. दि. २१  जून रोजी धन्वंतरी  पूजनाने कार्यक्रमाची  सुरवात झाली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य  महाविद्यालयीन डॉक्टर्स, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगतज्ञ लेंडे सर यांनी योगाबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले व जीवनातील योगाचे महत्व उपस्थिताना योग प्रात्यक्षिकातून पटवून दिले. शेवटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड सर यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.