अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल, आश्वी बु. ता. संगमनेर येथे ‘’साद सवांद – चला ताण घालवू या ’’ अंतर्गत प्रसिद्ध संमोहन तज्ञ नवनाथ गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यानात ते बोलत होते. धन्वंतरी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्राचार्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष आण्णासाहेब बलमे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे, उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. जितेंद्र शिंपी, डॉ. चंद्रकात गिरगुणे डॉ. राहुल बनारसे, डॉ. राजन कुलकर्णी, श्री. रावसाहेब काळे इ. अध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. समाजाला समुपदेशनाची नितांत गरज आहे कारण धकाधकीच्या जीवनचक्रात सध्याचा माणूस हा घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपले दैनंदिन जीवन व्यतीत करत आहे. आर्थिक सुबत्ता खूप आहे पण प्रत्येक जन मानसिक तणावात आहे. मानसिक तणावामुळे अनेक शारीरिक आजार होतात आणि माणूस नैराश्यात जातो किंबहुना अनेकजन आत्महत्या करतात किंवा व्यसनाधीन होतात.
या सर्वावर कोणतेही औषध जगामध्ये उपलब्ध नाही मात्र यावर एकच रामबाण उपाय म्हणजे स्वतः स्वतःचा मेंदू नियंत्रित करणे म्हणजेच संमोहन. मानसिक तणावातून बाहेर येण्यासाठी, आपले जीवन आनंदी व तणावरहित व्यतीत करण्यासाठी समुपदेशनाची समाजाला नितांत गरज आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध संमोहन तज्ञ नवनाथ गायकवाड यांनी प्रतिपादन केले. जीवनातील अनेक सहजशक्य गोष्टी त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. एकाग्रता, अभ्यासाच्या सुयोग्य पद्धती, केलेला अभ्यास स्मरणात राहण्यासाठी समुपदेशन थेरपी किती लाभदायक आहे हे प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. दैनंदिन जीवनात प्रसन्न राहणे व तणावमुक्त राहणे किती आवश्यक आहे याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.अभ्यास करताना एकाग्रता खूप महत्त्वाची आहे व एकाग्रतेने सहजरीत्या गोष्टी ग्रहण करता येतात याचे महत्त्व समजले. सरांनी भरपूर टीप्स दिल्या. ऑटोसजेशन पद्धती काय असते हे अगदी प्रात्यक्षिकासहित दाखवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रुतिका कानवडे हिने केले. पाहुण्याचा परिचय गायत्री नखाते हिने करून दिला तर आभार प्रदर्शन पवनकुमार वहाटूळे या विद्यार्थ्याने केले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांबरोबर अशोक पर्वत, गणेश गावडे,राहुल पठारे,अशोक गायकवाड, आकाश गायकवाड, कैलास खेमनर, सोमेश गायकवाड, अनंत बनसोडे, सोनाली बनसोडे, विशाल चौधर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.