धकाधकीच्या युगात प्रत्येकाने ध्यान धारणा करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालयातील पंचकर्म विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. मंदार भणगे यांनी केले. भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, भारत सरकार, नवी दिल्ली व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली २१ डिसेंबर २०२४ रोजी जागतिक ध्यान दिवस ‘आंतरिक शांती – जागतिक सुसंवाद’ या शीर्षकाखाली साजरा करण्यात आला प्रसंगी डॉ. भणगे बोलत होते. सध्या संपूर्ण जगामध्ये प्रत्येक जण ताण तणावात जगत आहे. प्रत्येक जण घडाळाच्या काट्याप्रमाणे व्यस्त आहे. त्यामुळे मनाची आंतरिक शांतता लोप पावत चालली आहे. परिणामी स्वभाव चिडचिडा बनत चालला आहे. यातूनच रक्दाब, मधुमेह इत्यादी आजार बळावत चालेले आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात ध्यान धारणा अतिशय महत्वाची आहे. आंतरिक मनातून घेतलेले निर्णय कधीही चुकत नाहीत. शालेय विद्यार्थ्यांना निश्चित चांगला फायदा यातून होतो.यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना डॉ. मंदार भणगे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे ध्यान धारणा समजावून दिली. उपस्थितांनी प्रत्यक्ष ध्यान धारणेतून दिव्य मन शांतीचा अनुभव घेतला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्यामल निर्मळ, डॉ. जितेंद्र शिंपी, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, डॉ. अंकिता काळे, डॉ. ज्योती खंदारे, डॉ. मधुबाला , डॉ. प्रियंका आढाव, डॉ. गीतांजली आहेर, डॉ. विक्रम शेलवले, रंगनाथ गिते, सुनिल भोंडे, अशोक पर्वत, संजय आंधळे, बाळासाहेब नागरे, रुपाली आंधळे, कल्पना वाल्हेकर, चैताली शिंदे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. श्यामल निर्मळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी संसदेतील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.