शिबिराचे ठिकाण :-अश्विन आयुर्वेद रुग्णालय मांची हिल, आश्वी बुll,ता.संगमनेर
दिनांक:-३०/०३/२०२१
अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय यांच्या वतीने पंचकर्म विभागाच्या अंतर्गत १५ फेब्रुवारी २०२१ पासून वासंतिक वमन शिबीर सुरु करण्यात आले.
या शिबिरा मध्ये रुग्णावर आणि स्वस्थ व्यक्तींवर वमन कर्म करण्यात आले. वमन शिबिर वैद्य. मंदार भणगे, वैद्य. अंबादास काळूखे, वैद्य. निशांत इंगळे यांच्या मार्फत आयोजन करण्यात आले.. या शिबिराला प्राचार्य वैद्य. लोखंडे सर तसेच तेथील सर्व स्टाफ यांचे सहकार्य लाभले. सदर वमन शिबीर १५ एप्रिल २०२१ पर्यंत सुरु राहणार आहे. संपूर्ण शिबिराचा कार्यक्रम रुग्णास कोणताही विशेष त्रास न जाणवता पार पडला.